पुणे : पुणे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील महत्त्वाचे शहर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे सुविख्यात आहे. गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात बेकायदेशीरपणे 5,000 बांगलादेशी नागरिक रहात असल्याचे गुप्तचर विभागाच्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पुणे शहर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. लष्कराचे दक्षीण मुख्यालय येथे आहे. पुणे परीसरात पुणे, देहु, खडकी ही लष्कराच्या दृष्टीने महत्तवाची ठिकाणे आहेत. तसेच रिझर्व बँकेचे महत्त्वाचे कार्यालय देखील पुण्यात आहे. पुणे शहरात यापुर्वी दोनदा बाँम्बस्फोट झालेले आहेत. तसेच नुकतेच पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून तरुणांची माथी भडकवणारा ISIS संबंधित डॉक्टर जेरबंद करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर 5,000 बांगलादेशी नागरिक पुण्यात बेकायदेशीरपणे राहत असणे, शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे. बांगलादेशी नागरिकांचे राहणीमान, आपल्या भारतातील पश्चिम बंगाल या राज्यातील लोकांशी मिळतेजूळते असल्याने, त्याचा गैरफायदा घेत बांगलादेशी नागरिक पुण्यात राहत आहे. या बांगलादेशी नागरिक शोधण्यासाठी, पुण्यात भाडे करार करुन राहणाऱ्या व्यक्तींनी मुळ मालकाशी योग्य तो करार केला आहे का? मुळ मालकाने त्यांच्या कागदपत्रांची व्यवस्थित पोलिसी पडताळणी केली आहे का? हे माहिती असणे आवश्यक आहे. अनेक घरमालकांनी याबाबत अनास्था दाखवली आहे. ज्यामुळे पुणे शहराला धोका निर्माण होवू शकतो.तरी आपण मोहिम उघडुन संयुक्तिक कारवाई करावी, तसेच अवैधरित्या शहरात राहणाऱ्या परदेशी नारिकांवर निर्बध आणावेत, या मागणीचे निवेदन शिवसेना पुणे शहरतर्फे पोलीस आयुक्तांना देण्यात आले.