राष्ट्रवादी पिंपरी विधान सभेच्या कार्याध्यक्षपदी इखलास सय्यद यांची नियुक्ती

282 0

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या पिंपरी विधानसभेच्या कार्याध्यक्ष पदी इखलास सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे व पिंपरी विधान सभेचे अध्यक्ष शाम लांडे यांनी सय्यद यांना नियुक्ती पत्र दिले.

प्रभावी संघटन कौशल्य, उत्तम वक्ता, नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारा, शासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव असणारा व आकुर्डीतील अभ्यासू आणि हुशार कार्यकर्ता अशी इखलास सय्यद यांची ओळख आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून आकुर्डी भागात सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्य असून आकुर्डीतील राष्ट्रवादीचा अनुभवी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी विधान सभेचे अध्यक्ष शाम लांडे, ज्येष्ठ नेते आझम भाई पानसरे, आमदार आण्णा बनसोडे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, जगदीश शेट्टी यांनी दिलेली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडू व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे, पक्ष संघटन मजबूत करणे, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देणे यावर जास्त भर देणार असल्याचे इखलास सय्यद यांनी सांगितले.

Share This News

Related Post

भीमा कोरेगावमध्ये दंगे व्हावे अशी काहींची इच्छा – चंद्रकांत पाटील

Posted by - January 1, 2023 0
पुणे: आज 205 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत असून शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो…

PUNE CRIME : नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयांचे कोकेन जप्त ; अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 1 ची मोठी कारवाई

Posted by - July 26, 2022 0
पुणे : मंगळवारी अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 1 मधील पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नालंदा गार्डन रेसिडेन्सी…
Pune News

Pune News : श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ कडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Posted by - January 22, 2024 0
पुणे : अयोध्येतील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तिपूर्ण रामगीते, मनोहारी नृत्यातून उलगणारे रामायणातील प्रसंग, कर्णमधुर शंखनाद, गंगा घाटावरील महाआरती, या…

VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

Posted by - September 8, 2022 0
डोणजे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन…

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022 0
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *