Hording Collapsed

पुण्यात IT पार्क लक्ष्मी चौकात महाकाय होर्डिंग कोसळले

802 0

पुणे : पुण्यातील (Pune) हिंजवडी (Hinjewadi) परिसरात आणखी एक दुर्घटना घडली आहे. यामध्ये आज दुपारी साडे तीनच्या सुमारास आयटी पार्क हिंजवडीतील लक्ष्मी चौकात एक महाकाय होर्डिंग (Hoarding Collapsed) मोठा अपघात झाला. हा होर्डिंग अलगत दुकानांच्या शेड व रस्त्यावर पडल्याने सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही दिवसांपूर्वी किवळे होर्डिंग दुर्घटनेत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

काय घडले नेमके?
लक्ष्मी चौकात (Lakshmi Chowk) मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा होर्डिंग कोसळला. या दुर्घटनेत एका मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच हेलकावे खाणारे हे होर्डिंग खाली पत्रा शेडमध्ये असलेल्या दुकानांच्या समोर अन रस्त्यावर तिरपे कोसळले. हे होर्डिंग कोणाचे आहे? ते अधिकृत आहे कि बेकायदाशीर आहे याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Share This News
error: Content is protected !!