Shashikant ahankari

Dr. Shashikant Ahankari : हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचं निधन

839 0

पुणे : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे प्रसिद्ध समाजसेवक, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी (Dr. Shashikant Ahankari) यांचे पुण्यात (Pune) निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या अणदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. शशिकांत अहंकारी यांच्याविषयी ?
डॉ. शशिकांत अहंकारी यांचे मूळ गाव खुदावाडी आहे. तिथून जवळ असलेल्या अणदूरमध्ये डॉक्टर अहंकारी यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. दोघे पती पत्नी जानकी हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते. समाजातल्या तळागाळातील लोकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून तसेच खेड्यांना अधिक प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळवण्यात मदत करण्यासाठी समर्पित टीमसह 1993 मध्ये हॅलो मेडिकल फाऊंडेशनची सुरुवात केली होती.

Share This News
error: Content is protected !!