पुणे: पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये शिरलं असून तब्बल 45 झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर 2 ठिकाणी घर पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली व कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीक भिंत पडली, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वारजे, स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत – शिवणे, सदगुरू सोसायटीत – सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये – नदीपाञ रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौक – शिवाजीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.