1 जानेवारी 2023 रोजी कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त लाखो अनुयायी मानवंदना देण्यासाठी येतात. त्यानिमित्तानं पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण तयारी केली असून, तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शिवाय आवश्यक ते वाहतूक बदलही करण्यात आले आहेत.
कोरेगाव भिमा येथील जयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त 1 जानेवारी 2023 रोजी लाखो अनुयायी मानवंदना देण्यासाठी येतात. त्यानिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 5 अपर पोलीस आयुक्त तसेच 15 पोलीस उपायुक्तांसह पाच हजार पोलिसांचा खडा पहारा असणार असून, सीसीटीव्हीद्वारे कार्यक्रमावर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.
हा अभिवादन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलीस दल, पुणे ग्रामीण पोलीस तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद यासोबतच आरोग्य विभागासह इतर विभागाकडून देखील तयारी करण्यात आलीये
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परिसरात अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी 5 स्पॉटर किट व्हॅन लावण्यात आल्या आहेत. तसेच व्हिडिओ कॅमेरा आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमावर देखरेख ठेवली जाणार आहे. पुणे पोलिसांच्या मदतीला होमगार्ड एसआरपीएफ कंपनी, रॅपीड अॅक्शन फोर्स असा बंदोबस्त असणार आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करतानाच हुल्लडबाजी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
कोरेगाव भिमा येथील जयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर कसा असेल पोलिसांचा बंदोबस्त पाहूयात
5 अपर पोलीस आयुक्त
15 पोलीस उपायुक्त
21 सहायक पोलीस आयुक्त
90 पोलीस निरीक्षक
250 सहायक पोलिस निरीक्षक /उपनिरीक्षक
4 हजार पोलीस अमलदार
15 बीडीडीएसची पथके
6 क्युआरटी हिट्स
5 आरसीपी स्ट्रायकिंग
1 हजार होमगार्ड
8 एमआरपी कंपनी