Hadapsar News

Hadapsar News : पतीसमोरच पत्नीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी सावकाराची भर पावसात हडपसर पोलिसांनी काढली धिंड !

3918 0

पुणे : 2 दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर (Hadapsar News) या ठिकाणी उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. यामध्ये हद्द म्हणजे या सावकाराने पतीसमोरच या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून हा तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला.या घटनेमुळे (Hadapsar News) संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीची भर पावसात धिंड काढली आहे. हा धिंड काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

इम्तियाज हशीम शेख (वय 47) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बोपखेल येथील 34 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख याने फिर्यादी महिलेच्या पतीस 40 हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे ते परत करू शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2023 मध्ये इम्तियाज याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्यासमोरच फिर्यादीवर बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपीने (Hadapsar News) याच कारणातून तिच्याकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली; परंतु तिने नकार दिला असता त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून आणि व्हिडीओ सामाजिक माध्यमावर प्रसारित केले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!