पुणे शहरात हाय अलर्ट..! कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या, पुणे महापालिकेचे खासगी आस्थापनांना आवाहन

320 0

पुणे : पुणे शहर आणि परिसराला येत्या 48 तासात अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील अलर्ट झाले आहेत.
दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात देखील सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत.त्यामुळे नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सातत्याने केला जातो आहे. पावसाच्या अंदाजानुसार नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येत असला,तरी रस्ते देखील नदीचे रूप घेऊन वाहत आहेत.
पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि छोटे-मोठे अपघात होत आहेत.

येत्या 48 तासात हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शाळांना सुट्टी घोषित केली आहे. तर आता वाहतूक कोंडी,अपघात अशा घटना घडू नयेत यासाठी खाजगी आस्थापनांना देखील महानगरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होऊन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी देखील सतर्क राहून खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक कारणा शिवाय पुढील दोन दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!