CRIME NEWS : भर दहीहंडीच्या उत्सवामध्ये सिंहगड रोडवर टोळीयुद्ध ; फायरिंग … पूर्ववैमानस्यातून कोयत्याने वार !

329 0

पुणे : पुणे शहरामध्ये शुक्रवारी दहीहंडीचा उत्सव एकीकडे जोरदार साजरा केला जात असतानाच , एक धक्कादायक घटना घडली आहे . दोन टोळ्यांमध्ये काल वाद उफाळून आला , आणि या वादाचे रूपांतर थेट फायरिंग पर्यंत पोहोचले . सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील समर्थ नगर भागातील दहीहंडी उत्सवामध्ये काल टोळी युद्ध उफाळून आले . यामध्ये एका गुन्हेगाराच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आल्या असून एकाने हवेत गोळीबार देखील केला असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार , वडगाव बुद्रुक येथील गुन्हेगार चेतन ढेबे आणि किरण चांदणे यांच्यामध्ये वाद होता . शुक्रवारी सायंकाळी या टोळीतील वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि चांदणे याच्या टोळीतील एकाने शुभम मोरे याच्या डोक्यात कोयत्याने वार केला . त्यामुळे परिसरात खळबळ उडाली . या घटनेने नागरिक घाबरले असताना त्यातच एकाने हवेत फायरिंग देखील केली आहे . या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली , परंतु तोपर्यंत गुन्हेगार पसार झाले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!