PMPMLGOODNEWS: ‘पीएमपीएमएल’ला बाप्पा पावला!; दहा दिवसात तब्बल ‘इतक्या’ कोटींचं उत्पन्न

203 0

पुणे: नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात पुण्यात अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे सात सप्टेंबर पासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.

7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या दहा दिवसात यंदा पीएमपीएमएलला मोठा फायदा झाला आहे.

गणेशोत्सवात पुण्यातील मंडळांमध्ये केले जाणारे जिवंत देखावे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी असंख्य भावी पुण्यात येत असतात आणि यासाठी पी एम पी एम एल कडून दरवर्षी जादा बसेसचे नियोजन केलं जातं या जादा गाड्यांना व नियोजित पीएमपीएमएल बसला आहे भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून पीएमपीएमएलला मोठा फायदा झाला आहे गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पीएमपीएमएल बस ने 1 कोटी 28 लाख 56 हजार 59 प्रवाशांनी प्रवास केला तर यातून 17 कोटी 43 लाख 67 हजार 215 इतका उत्पन्न पीएमपीएमएलला जमा झालं. 2023 च्या तुलनेत या उत्पन्नात वाढ झाली आहे.

2023 मध्ये 1 कोटी 21लाख 62 हजार 159 प्रवाशांनी पीएमपीएमएलने प्रवास केला होता त्यातून पीएमपीएमएलला 16 कोटी 92 लाख 25 हजार 464 इतका उत्पन्न मिळालं होतं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!