जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत जागावाटपावर मोठ विधान केलं आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुक जाहीर होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळतेय. 18 19 आणि 20 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीमध्ये हे जागा वाटपाला अनुसरून मॅरेथॉन बैठका पार पडल्यासही पाहायला मिळालं मात्र अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आमची सर्व 288 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी आहे असं म्हणत मोठे विधान केलं आहे.