Pune crime : आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागून थेट पुण्यातील ‘या’ महिला आमदारालाच फसवले ; आरोपी अटक

504 0

पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी औरंगाबाद मधून ताब्यात घेतले आहे .

सविस्तर माहिती नुसार ,आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून काही दिवसांपूर्वी आरोपी मुकेश राठोड यांनी आईची तब्येत बरी नसल्याच्या कारणावरून पैशांची मदत मागितली होती . याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कन्या पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल केली होती .

त्यानुसार आरोपी मुकेश राठोड याच्या मागावर पोलीस होते .काही दिवसांपूर्वी राठोड यांनी त्याची आई बाणेर येथील एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यासाठी पैशांची मदत मागितली .गुगल पे च्या माध्यमातून माधुरी मिसाळ यांनी त्यास 3,400 रूपयेची मदत केली. परंतु त्यानंतर हा आरोपी फरार झाला.

या आरोपीने विधानसभा आमदार मेघना बोर्डीकर साकोरे ,आमदार देवयानी फरांदे, आमदार श्वेता महाले यांच्याकडे देखील पैशांच्या मदतीची मागणी केली होती .परंतु या तिघींनाही संशय आल्यामुळे त्यांनी पैसे पाठवले नाहीत.

संबंधित आरोपी मुकेश राठोड याने त्याच्या एका साथीदारासह थेट आमदारांच्याच फसवणुकीचा कट रचला. राठोड हा मूळचा बुलढाणा मधील रहिवासी असून तीन दिवस शोध घेतल्यानंतर अखेर औरंगाबाद मध्ये हा आरोपी सापडून आला आहे.

Share This News
error: Content is protected !!