Prof. Ram Takawale

Prof. Ram Takawale : ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्रो.राम ताकवले यांचे निधन

574 0

पुणे : ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत प्रो. राम ताकवले (Prof. Ram Takawale) यांचे आज निधन झाले आहे. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले होते. तसेच महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल)(MKCL) झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.

तसेच त्यांनी शिक्षकांसाठी बॅचलर ऑफ एज्युकेशन, मुक्त शिक्षण स्त्रोत निर्मिती आदी विविध प्रकारच्या साहित्यांचे लेखनसुद्धा केले होते. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग हा पुरस्कार (Common Wealth of Learning Award) जाहीर करण्यात आला होता. याचबरोबर त्यांना राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

त्यांनी मुक्त विद्यापीठानंतर 1996 ते 1998 या काळात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पदाची जबाबदारी देखील सांभाळली होती. त्या ठिकाणी त्यांनी प्राध्यापकांना स्वातंत्र्य देऊन समाजाभिमुख शिक्षणक्रमासाठी महत्वपूर्ण कार्य केले होते.

Share This News
error: Content is protected !!