अखेर फुरसुंगी, उरळी देवाची गावं पुणे महानगरपालिकेतून वगळली; कचरा डेपो मात्र…

158 0

पुणे: पुण्यासाठीची एक मोठी बातमी समोर आली असून पुणे महानगरपालिकेत असणारी फुरसुंगी व उरळी देवाची ही दोनही गाव पुणे महानगरपालिकेतून वगळण्यात आली आहेत त्यासाठी ती शासन अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेत नव्याने 23 गावं समाविष्ट केल्यानंतर फुरसुंगी व उरळी देवाची या गावांचा समावेश आहे पुणे महानगरपालिकेत करण्यात आला होता मात्र या ठिकाणी स्वतंत्र नगरपालिका उभारण्यात यावी अशी मागील अनेक वर्षांची मागणी होती.

राज्याचे माजी जलसंपदा जलसंधारण व संसदीय कार्यराज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती अखेर शिंदे सरकारने ही मागणी मान्य करत फुरसुंगी व उरळी देवाची या ठिकाणी स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला.

मात्र पुणे महानगरपालिकेतून ही दोनही गाव वगळण्यात आली असली तरी फुरसुंगी येथील कचरा डेपो मात्र पुणे महानगरपालिकेकडेच राहणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide