ऑनलाईन कॅब अग्रेगटर साठी श्रीवास्तव समितीकडं पाठवले तब्बल ‘इतके’ हजार अभिप्राय

1582 0

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड मधून 20,000 रिक्षाचालकांनी व नागरिकांनी ऑनलाईन कॅब अग्रेगटर बाबत महाराष्ट्र राज्यासाठी कायदा बनवणाऱ्या सुधीर श्रीवास्तव समितीकडे बघतोय रिक्षावाला संघटनेमार्फत अभिप्राय पाठवले.मोठ्या संख्येने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या 8 दिवसात हजारो रिक्षाचालक व नागरिकांची माहिती जाणून घेऊन ती संकलित करून समिती कडे पाठवली.

पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मदतीने ऑनलाईन ॲप्स वरून रिक्षा हटवण्याचा ओला, उबर सारख्या कंपन्यांचा प्रयत्न असून ऑनलाईन फक्त कॅब उपलब्ध राहाव्यात यासाठी प्रयत्न चालू आहे. कॅब (चार चाकी) गाड्यांवर मीटर नसल्यामुळे त्यामाध्यमातून मनाला वाटेल ते भाडे कंपन्यांना आकारते येते व प्रवाशांची लूट करता येते.परंतु रिक्षा वर मीटर असल्याकारणाने मीटर पेक्षा ठराविक रकमेहुन जास्त रक्कम ग्राहकांकडून घेता येत नसल्याने कंपन्यांना अव्वाचा सव्वा नफा मिळवता येत नाही. यासाठी शक्कल लढवून कंपन्यांच्या दृष्टीने फायदेशीर होईल असा निर्णय देण्यासाठी पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या कंपनीच्या ॲप्स वर रिक्षाला परवानगी नाकारून फक्त कॅब ला परवानगी दिली आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात ऑनलाईन कॅब सेवेचे दर प्रचंड प्रमाणत वाढून नागरिकांना या कंपन्यांवर अवलंबून राहिल्यामुळे दुसरा पर्याय उपलब्ध नसणार आहे. दुसरीकडे या कंपन्यांची मात्र चांदी होणार आहे.अश्याच प्रकारे वारंवार या धनदांडग्या कंपन्यांना फायदेशीर ठरतील असे वादग्रस्त निर्णय घेऊन नागरिकांची सुरक्षितता, प्रवाशांचे आर्थिक नुकसान व रिक्षाचालकांच्या रोजी रोटीवर घाला घालणाऱ्या पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे निलंबन करावे या मागणीवर सुद्धा हजारो रिक्षाचालकांनी अभिप्रायासोबत सह्यांची मोहीम हाती घेतली. या अधिकाऱ्यांच्या अश्या कंपनी धार्जिण्या वागण्यामुळेच संपूर्ण देशात न होता फक्त पुणे शहरात रिक्षाचालकांना तीव्र आंदोलने करावी लागली.

Share This News
error: Content is protected !!