Sanjay Kakde

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

412 0

पुणे : माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या अडचणीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये माजी खासदार संजय काकडे यांच्यासह 18 जणांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

याबाबत याचिकाकर्ते विकास कुचेकर म्हणाले की, शिवाजीराव भोसले सहकारी बँक अर्थिक गैरव्यवहारमध्ये बँकेत ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या रोख व शिल्लक रकमेबाबत पडताळणी केली होती. यावेळी बँकेकडे 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आहे. दरम्यान, माजी खासदार संजय काकडे यांना त्यांचे नातेवाईक अनिल भोसले अध्यक्ष असलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून वेगवेगळ्या कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या दिले आहे. यामध्ये व्याजासह अंदाजे झालेले 60 कोटी रुपयांचे कर्ज वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सदर कर्ज प्रकरणात बनावट कागदपत्र दिली आहेत असा आरोप विकास कुचेकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

कोणावर दाखल करण्यात आला गुन्हा?
याप्रकरणी भोसले सहकारी बँकेचेअध्यक्ष अनिल भोसले, बैंकेचे शाखा व्यवस्थापक सुनीता लालासाहेब बांदल आणि विकास पवार, संजय काकडे, उषा संजय काकडे, विक्रम संजय काकडे, व्ही. वाय. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. डायरेक्टर : सोमनाथ वैजनाथ साखरे, अशोक गजानन यादव, जोनास होल्डिंग प्रा. लि. डायरेक्टर विकास गजानन यादव, पृथ्वीराज संभाजी काकडे, रोहन उमरसिंग परदेशी, मे. पुष्पक प्लाय भागीदार: जैन दीपक दयालाल, जैन प्रकाश दयालाल, मे. काकडे पॅलेस मंगल कार्यालय भागीदार यादव, काकडे ग्रीन इस्टेट प्रा. लि. डायरेक्टर रमेश भोसले, चंद्रकांत बोडा यांच्यावर भा द वि कलम 409, 420, 467, 468, 471,120बी, 34 अनुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी सीआरपीसी 156 (3) अनुसार मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात केली होती. दरम्यान, न्यायालयाने अर्जदाराची सी आर पी सी 156 (3) ची विनंती अमान्य केली. त्यानंतर अर्जदाराने जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी अपील दाखल केले. याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांचासह 18 जणांना न्यायालयाने नोटीस काढली आहे, अशी माहिती विकास कुचेकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Narendra Modi : नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईन; ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!