पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीचे कर्ज बुडविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीच्या शेअर्सची विक्री करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती मनिष पितळे यांनी हे आदेश दिले आहेत. याप्रकरणी विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीने माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्यासह इतरांविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे.
संजय काकडे यांच्या अडचणींमध्ये वाढ
माजी खासदार संजय काकडे यांच्यावर यापूर्वीही कोर्टाने कारवाई केली होती. डीएचएफएल बँक कर्ज बुडविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावनीत काकडे यांच्या शिवाजीनगर येथील भाबुर्डा येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील 7 हजार 440 चौरस फुट प्लॉटचा प्रत्यक्ष ताबा तर यशवंत घाडगे नगर येथील संजय काकडे यांच्या बंगल्याचा प्रतिकात्मक ताबा घेण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते.
4 जुलै रोजी होणार सुनावणी
काकडे यांच्या काकडे यांच्या इस्टेट डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनी विरोधात एचडीएफसी व्हेन्चर्स ट्रस्टी कंपनीद्वारे 133 करोड 75 लाख रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीत काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीच्या शेअर्सची विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जुलै रोजी पार पडणार आहे. तक्रार दाखल करणाऱ्या कंपनीच्या वतीने अॅड. जतीन पोरे, अंकीता आगरवाल हे काम पाहत आहेत.
भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडेंच्या पत्नी उषा काकडे यांच्या अडचणीत वाढ
786 कोटी रुपयांचे कर्ज थकवले
विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीने माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्यासह इतरांविरोधात कर्ज बुडविल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये वीस्ट्रा कंपनीने काकडे यांच्याकडे 786 कोटी रुपयांचे कर्ज थकित असल्याचा दावा करण्यात आला आहे.