Tesla Car

Tesla Office Pune Details : टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात होणार ! कुठे अन् किती असेल ऑफिसचं भाडं

2964 0

पुणे : जगप्रसिद्ध टेस्ला कारची निर्मिती करणारी टेस्ला (tesla) कंपनीने भारतात पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी भारतात पहिलं कार्यालय थाटण्यासाठी पुण्याची निवड केली आहे. त्यासाठी पुण्यातील विमान नगर भागातील पंचशील टेक पार्कमध्ये कंपनीने जागा भाड्याने घेण्याचे ठरवले आहे. यामुळे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला टेस्लाच्या येण्याने प्रगतीच्या आणखी मोठ्या संधी खुल्या होणार आहेत.

ऑफिसचे किती असेल भाडं?
एलॉन मस्कला ज्या टेस्ला कारने जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनवलं.टेस्ला कंपनी जी अमेरिकन शेअर बाजारातील सर्वात फायदेशीर कंपनी म्हणून ओळखली गेली. ती टेस्ला कार आता भारतात येत आहे. भारतात इलेक्ट्रिक कारचं उत्पादन सुरु करण्याची तयारी करणाऱ्या टेस्लाने कार्यालयीन कामकाजासाठी पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे. इथल्या पहिल्या मजल्यावरील 5 हजार 800 स्क्वेअर फूट जागा टेस्ला कंपनीनं तीन वर्षांसाठी भाड्यानं घेतली आहे. याचं मासिक भाडं 11.65 लाख रुपये असणार आहे. या ऑफिसचा भाडेकरार 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार असून दोन्ही कंपन्यांनी 36 महिन्यांच्या लॉक इन पिरिएडनुसार हा करार केला आहे. दरवर्षी 5 टक्के भाडं टेस्लाकडून वाढवून दिलं जाणार आहे. तसेच 5 वर्षानंतर पुढे पुन्हा 5 वर्षांपर्यंत करार वाढवण्याची तरतूदही करण्यात आळी आहे. त्यामुळे हा करार पुन्हा वाढवल्यास तो 10 वर्षांसाठी लागू असेल.

कुठे आहे हे पार्क?
पंचशील बिझनेस पार्कचं सध्या बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी एकूण 10 लाख 77 हजार 181 स्वेअर फुटांचं बांधकाम केलं जात आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे बिझनेस पार्क केवळ 3 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी कोरेगाव पार्क, खर्डी, वडगावशेरी, कल्याणी नगर या सारख्या ठिकाणांहून सहज पोहोचणं शक्य आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!