Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

474 0

पुणे : पुण्यातून पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्हची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन आरोपीने आपल्या भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना ताजी असताना पुण्यातून अजून एक ड्रंक अँड ड्राइव्हची घटना समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी चालवणाऱ्या चालकानं एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. सुदैवानं या अपघातात ही महिला थोडक्यात बचावली असून, सुखरूप आहे. पुण्यातील नवले ब्रीजवर ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी चालवणाऱ्या चालकानं एका दुचारीस्वार महिलेला धडक दिली. आहे. या अपघातातून ही महिला थोडक्यात बचावली आहे. अपघात घडला तेव्हा संबंधित चालक हा नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या नवले ब्रीजवर ही घटना घडली आहे. या प्रकरणात आता संबंधित कर्मचाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!