मध्यरात्री गावावर ड्रोनच्या घिरट्या आता घरांवर दगडफेक; भोरमधील गावकऱ्यांची झोप उडाली, वाचा सविस्तर 

310 0

पुण्यात नेमकं चाललय तरी काय ? हा प्रश्न पडण्यासारखा अनेक घटना पुणे शहर आणि ग्रामीण भागात घडत आहेत. अनेक दिवसांपासून पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याच्ये प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर काही गावांमध्ये चोऱ्या झाल्या आणि आता रात्रीच्या वेळी बाहेरून घराच्या दारांच्या कड्या लावण्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पुण्यातील भोर येथील बारे खुर्द गावात अनेक दिवसांपासून ड्रोन घिरट्या घालत आहेत. त्यातच आता गावातील काही घरांना बाहेरून कड्या लावण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्याचबरोबर गावातील काही घरांवर दगडफेक देखील झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमधील भीती वाढली असून रात्रीची झोपही उडाली आहे.‌

या गावातील काही घरांवर अज्ञात व्यक्तीने दगड मारले. काही घरांच्या कड्या लावून पळून गेले. हे सगळं नेमकं कोण करत आहे हे पाहण्यासाठी आता गावातीलच तरुण मुलांनी जागता पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याच गावात 29 जुन रोजी रात्री 1 वाजता एक अज्ञात चार चाकीगाडी आली व कुठेही न थांबता फिरुन गेली. त्यानंतर थोड्या वेळात 6 ते 7 अनोळखी व्यक्तींनी हातामध्ये कोयते घेऊन दोन घरांच्या कड्या वाजविल्या त्यामुळे गावामध्ये आरडा ओरडा झाला. काही मिनिटातच ग्रामस्थ जमा झाले. गावकऱ्यांनी या कोयताधारी व्यक्तींचा पाठलाग केला मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले. त्यानंतर आता गावामध्ये रोज रात्री अकरानंतर घरावर दगड टाकण्यात येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची रात्रीची झोप उडाली असून आता पोलिसांनीच गावामध्ये पहारा द्यावा अशी मागणी हे गावकरी करत आहेत.

साहेब, सीसीटीव्ही बसवा

दहशत पसरवणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी बारे खुर्दच्या ग्रामपंचायतीने भोरचे तहसिलदार सचिन पाटील आणि पोलीस निरीक्षकांना भेटून निवेदन दिले आहे. या भीतीदायक घटना रोखण्यासाठी आता पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास या घटनांमागे कोण आहे याचा तपास लागेल, त्यामुळे सीसीटीव्ही बसवावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!