डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते तेजस्वी सेवेकरी व रेगे दाम्पत्यास डॉ. पूजा यादव गौरव पुरस्कार प्रदान

133 0

पुणे : सामाजिक क्षेत्रात गल्यामर्स ची क्रेझ वाढत असताना कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी समाजाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात केले.

अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेतर्फे ज्येष्ठ सामाजिक दिवंगत कार्यकर्त्या डॉ पूजा यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी रस्त्यावरील दत्त मंदिराजवळील मांगल्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ मोरे बोलत होते. डॉ. मोरे यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संतुलन संस्थेचे संस्थापक ऍड बी एम रेगे व संचालिका पल्लवी रेगे खाणकामगारांच्या हक्कासाठी कार्याबद्दल आणि सहेली संस्थेच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी याना देवदासी महिलांना परिसर स्वच्छतेचे मह्त्व पटवून देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल डॉ पूजा यादव गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकास यादव, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, सामाजिक कार्यकर्ते भोला वांजळे,माजी नगरसेवक दत्ता सागरे, काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवीण करपे,दादा पासलकर,आनंद सराफ,गणेश चव्हाण, वंदना भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ मोरे आपल्या भाषणात म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे . प्रकाश यादव यांनी प्रास्ताविक केले . वांजळे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide