VIDEO : पुण्यामध्ये जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्यांप्रमाणे सहज फिरताना दिसून आले तर दचकू नका ; पहा ही बातमी

587 0

पुणे : तुम्ही आजपर्यंत अनेक चित्रपट अभिनेता आणि अभिनेत्रींचे डुप्लिकेट पाहिले असतील , पण कधी अभिनेत्यांचे डुप्लिकेट पाहिले आहेत का ? अचानक कधी रस्त्याने जाताना जर अचानक तुम्हाला पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसले तर दचकू नका, कारण पुण्यामध्ये फक्त प्रति बालाजी किंवा प्रति शिर्डीच नाही तर प्रति एकनाथ शिंदे देखील आहेत .

हुबेहूब एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसणारे हे आहेत विजयराजे माने … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी अगदी साधी राहणी, पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावर कुंकवाचा टिळा , दाढीची स्टाईल हे अगदी हुबेहूब इतकं जमून आलं आहे की , त्यांना पाहून अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गोंधळू शकतील .

विजयराजे माने यांच्या या लुक विषयी बोलताना ते म्हणाले की , “गेल्या 25 दिवसांपासून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कामकाज पाहतो आहे . ते सातत्याने धडाडीचे निर्णय घेत आहेत . तळागाळातून आलेला कार्यकर्ता देखील काय करू शकतो हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे . मी त्यांच्यासारखा दिसतो आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी केवळ त्यांच्यासारखीच ड्रेसिंगची पद्धत बदलली आणि पांढरे शुभ्र कपडे घातले . त्यांच्यामुळे मला समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळते आहे . मला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पाहण्याची इच्छा असल्याचं देखील माने यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!