PUNE : केंद्र सरकारच्या 5% GST संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेने पुकारलेला बंद यशस्वी

231 0

पुणे : पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या अंतर्गत व्यापारी वर्गाने पुकारलेला बंद यशस्वी रीत्या शांततेत शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून , विरोध झाला नाही. केंद्र सरकारने ब्रॅन्डेड तसेच नॉन ब्रॅन्ड मालावर 5% GST संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बंद पाळण्यात आला .

या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भारतीया तसेच महामंत्री प्रविण जी खंडेलवाल यांच्या सोबत चर्चा सुरू असून , या संदर्भात मंगळवार दि 26/7/22 रोजी राष्ट्रीय पातळीवर कौर कमेटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे , अशी माहिती सचिन दिनकर निवंगुणे यांनी कोर कमेटी सदस्य राष्ट्रीय कमीटी यांनी दिली.

तसेच स्थानिक पातळीवर प्लास्टीकच्या पिशवी वापर बाबत होणारी चुकीची कारवाई या संदर्भात पुणे मनपा आयुक्त यांची भेट घेऊन दाद मागणार असल्याचे व्यापारी संघाने सांगितले. त्यांच्या सहकार्याने आपले शहर प्लास्टीक मुक्त कचरा करण्या संदर्भात योग्य ते नियोजन करणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे .

तसेच येणारे सण-उत्सव वर्गनी संदर्भात पुणे पोलिस कमिशनर यांची भेट घेऊन पत्र व्यवहार करून स्थानिक पातळीवर प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत व्यापारी वर्गाची मीटींग आयोजित करण्यात यावी यासाठी संघटना प्रयत्न करणार , असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत प्रमुख उपस्थिती शहर अध्यक्ष सुनील गेहलोत,शहर उपाध्यक्ष कुमार खत्री, जनरल सेक्रेटरी नवनाथ सोमसे, धानोरी अध्यक्ष नाना टींगरे, केशवनगर अध्यक्ष बापु गायकवाड, वारजे अध्यक्ष रामभाऊ दोडके, कोथरूड अध्यक्ष रविंद्र सारूक तसेच इतर भागातील व्यापारी प्रतीनीधी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!