वीज वितरणच्या गलथान कारभाराने तरुणाचा मृत्यू , कुटुंबियांना ५० लाख नुकसान भरपाई द्या ; भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांची मागणी

280 0

पुणे : महाराष्ट्र वीज वितरण मंडळाच्या गलथान कारभारामुळे काळभोर नगर मधील तरुण नितीन काशिनाथ मेलाळे (वय ३४ ) यांचे विजेच्या खांबाला हात लागल्यामुळे शॉक लागून निधन झाले आहे.

महाराष्ट्र वीज वितरण मंडळाच्या गलथान कारभारामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . पिंपरी चिंचवड मधील या घटनेने परिसरात शोक काळा पसरली आहे.
महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच या तरुणाला जीवास मुकावे लागले आहे ,याप्रकरणी भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राच्या माध्यमातून या युवकाच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला महाराष्ट्र वीज वितरण कंपनीमध्ये कायमची नोकरी वीज वितरण कंपनीने द्यावी अशी मागणी केली आहे.

नितीन यांच्या मागे त्यांची दोन लहान मुले,पत्नी आई,वडील व एक लहान भाऊ असे कुटुंब आहे ,नितीन हे एका खासगी कंपनी मध्ये काम करत होते.

Share This News
error: Content is protected !!