dattwadi-police-thane

दत्तवाडी पोलीस स्टेशन आता ओळखले जाणार ‘पर्वती’ पोलीस स्टेशन

425 0

पुणे : पुण्यातील बहुचर्चित आणि गुन्हेगारीचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “दत्तवाडी” पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता दत्तवाडी पोलीस ठाणे “पर्वती” पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाणार आहे. शहर पोलीस दलातील महत्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी दत्तवाडी पोलीस ठाणे हे एक आहे. 2008 मध्ये हे पोलीस ठाणे सुरू झाले आहे. पुर्वी हा परिसर स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत होता. वाढते नागरिरकरण आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलीस ठाण्याचे विभागाजन करून दत्तवाडी पोलीस ठाणे झाले. त्याकाळी या परिसरातील साडे पाच लोकसंख्या होती. आता ती दुपटीने वाढली गेली आहे. चार पोलीस चौकीचा परिसर आहे. दोन पोलीस निरीक्षकांसह 12 अधिकारी व 87अंमलदार या पोलीस ठाण्यात कार्य करत आहेत.

Dattawadi to parvati Police Station name change

हे पोलीस स्टेशन पर्वती परिसरात आहे. पाठिमागे ऐतिहासिक पर्वती मंदिर आणि टेकडी आहे. त्याखाली हे पोलीस ठाणे आहे. त्यामुळे त्याला पर्वती नाव असावे, असा लोकांचा आग्रह होता. दत्तवाडी म्हटल की, अनेकजन दत्तवाडी परिसरात जातात. तेथील चौकीत गेल्यानंतर त्यांना हे पोलीस ठाणे नाही तर चौकी असल्याचे समजते. परत पुन्हा त्यांना पोलीस ठाणे शोधत यावे लागते. त्याचा त्रास सर्वांना होतो. यामुळे लक्ष्मीनगर रहिवाशी संघाने पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यासाठी पुढाकार घेऊन पत्र व्यवहार केला होता. या पत्र व्यवहाराला आता यश आले असून सरकारने दत्तवाडी पोलीस स्टेशन चे नाव बदलून पर्वती’ पोलीस स्टेशन करण्यास मंजुरी देणारा सरकारी GR काढला आहे.

Share This News
error: Content is protected !!