पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ) 26 वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (Darshana Pawar Murder Case) आढळून आला होता. या प्रकरणामुळे (Darshana Pawar Murder Case) परिसरात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी ज्या दिवशी हा खून झाला त्याचा त्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.
Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू
दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कारासाठी ती 9 जून रोजी पुण्यात आली होती. नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी सिंहगडावर जायचे आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हंडोरे हा मित्र होता. 12 जूनला तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधला असता तिचा संपर्क होऊ शकला नाही. यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला मात्र कुठेच पत्ता लागला नाही. अखेर शेवटी तिच्या पालकांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलिसांत दिली.
Vaishali Hotel : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचा वाद थेट पोलिसांत; काय आहे नेमके प्रकरण?
तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या कुटुंबीयांनीही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली. दर्शना आणि तिचा मित्र राहुल 12 जून रोजी दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. यानंतर दोघांनी गड चढायला सुरुवात केली. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही तो खाली आल्याचे दिसून आले. या घटनेनंतर राहुल हंडोरे फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.