Sunil Mane

Constitution Day : शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करावा सुनील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

326 0

पुणे :  यावर्षीचा संविधान दिवस (Constitution Day) Preamble-‘प्रास्ताविका’चे महत्व सांगण्याची थीम घेऊन राज्यात साजरा करावा अशी मागणी मी मुख्यमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज केली. याबाबतचे पत्र आज ईमेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर 2021 साली भारताच्या महामाहीम राष्ट्रपतींनी संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये संविधानाची प्रस्ताविका वाचून संविधान दिन समारंभाचा शुभारंभ केला होता. यावेळी, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, मंत्री, संसद सदस्य, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याबाबत भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाने 13 नोव्हेंबर 2021 रोजी पत्राद्वारे निर्देश जारी केले होते. याबरोबरच प्रास्ताविका वाचनाचा कार्यक्रम सर्व कार्यालयांमध्ये सर्व ठिकाणी आयोजित करण्यात यावा. इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये प्रास्ताविका वाचन करावे. ‘संविधानिक लोकशाही’ या विषयावर ऑनलाइन प्रश्नमंजुषा कार्यक्रम घ्यावा. तसेच, संविधान जागृतीसाठी वेबिनर, इतर कार्यक्रम आयोजित करावे. अशा सूचना संसदीय कार्य मंत्रालयाने केंद्राच्या सर्व मंत्रालयीन विभागांना दिल्या होत्या.

केंद्र सरकारने 2015 साली 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस दरवर्षी देशभर साजरा करण्याचे घोषित केले होते. त्या अनुषंगाने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त दोन दिवस संसदेचे विशेष सत्र बोलावून संविधानावर चर्चा झाली होती. कोरोना नंतर महामहिम राष्ट्रपतींनी संविधान प्रास्ताविका वाचन करून संविधान दिनाची सुरुवात करणे हे पहिल्यांदा घडले होते. केंद्र शासनाप्रमाणे राज्य सरकारनेही याबाबत आदेश पारित करून संविधान दिन साजरा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे अशी विनंती या पत्राद्वारे मी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!