तळेगावात नागरिक एकवटले ! किशोर आवारे खून प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी

862 0

पुणे : पुणे येथील तळेगाव या ठिकाणी भरदिवसा 12 मे रोजी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (Kishore Aware) यांच्यावर गोळीबार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आमदार सुनील शेळके(Sunil Shelke), सुधाकर शेळके(Sudhakar Shelke), संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी गौरव भानू खळदे (रा. तळेगाव)(Gaurav Bhanu Khalde) याला अटक केली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे (Bhanu Khalde) आणि किशोर आवारे यांचा जुन्या नगरपरिषद इमारतीच्या आवारात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग मुलगा गौरव याच्या मनात होता. त्यातूनच त्याने इतर आरोपींना किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. यानंतर आता या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी नागरिकांनी मोर्चा काढला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide