Chitra Wagh

Chitra Wagh : राजकीय रंग द्यायचा नाही म्हणता… चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

686 0

पुणे : सध्या राज्यात जालना येथील मराठ्यांच्या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यादरम्यान आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
राजकीय रंग द्यायचा नाही म्हणता…पण नेमकं तेच करून सामाजिक सलोख्याचा तुम्ही बेरंग करताय उद्धवजी!

आरक्षण प्रामाणिकपणे दिले म्हणता… पण न्यायालयीन कसोटीवर ते टिकणार नाही, अशी फट ठेवण्याचा अप्रामाणिकपणा कसा केलात उद्धवजी?

तुमच्यावेळी लाठ्या उगारण्याची वेळ आली नाही म्हणता… आंदोलनकर्त्या एसटी कामगारांवर पडल्या, त्या काय होत्या उद्धवजी?

सणांच्या दिवसांत अधिवेशन ठेवून आम्ही सणांना आडवं जातो म्हणता… पण मग तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?

आम्हाला एक फुल- दोन हाफ आणि कारभार शून्य म्हणता… तुम्ही तर अडीच वर्षांत मंत्रालयाची पायरीही चढला नाहीत उद्धवजी!

अजूनही स्वत:ची कुवत न ओळखता महाराष्ट्र उभा करतो म्हणता…तुम्ही तर तुमचा आख्खा पक्षच बसवला उद्धवजी!

आज शांतीत भेटायला आलोय, असं म्हणता…मग उद्या पेटवण्याची भाषा कशाला उद्धवजी?
.
.
.
बात निकलेगी तो बहोत दूर तक जाएगी उद्धवजी…!

Share This News
error: Content is protected !!