माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

265 0

पुणे: माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी असणार नाही. स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहतूकीस पीएमपीएमएल बसेस वगळून बंदी असेल. प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोरुन नागदेव ऑईल डेपो चौक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नो-पार्किंग, नो-हॉल्टींग करण्यात येत आहे.

पीएमपीएमएल बसेसचे मार्ग :

या कालावधीत पीएमपीएमएल बसेससाठी प्रीमियर गॅरेज चौक, मंगला सिनेमागृहासमोरुन उजवीकडे वळून खुडे चौक, उजवीकडे वळून पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रीमियर गॅरेज चौक असा पुणे मनपा येथील वर्तुळाकार बस मार्ग राहील. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला सिनेमागृहासमोरुन पुढे उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, डावीकडे वळून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पुरम चौक मार्गे जातील.

स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला थिएटर समोरुन पुढे डावीकडे वळून राष्ट्रवादी काँग्रेस भवन उजवीकडे वळून कुंभारवेस चौक डावीकडे वळून शाहिर अमर शेख चौक मार्गे जातील. कोथरुडकडून येणाऱ्या व अप्पा बळवंत चौक मार्गे पुणे स्थानककडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून कुंभार वेस चौक मार्गे पुणे स्थानकाकडे जातील.

दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी मार्ग:

ही वाहने स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज मार्गाने बालगंधर्व चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

जिजामाता चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाण्याकरीता पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप रोडने किंवा उजवीकडे वळून लक्ष्मी रोडने सोन्या मारुती चौक, बेलबाग चौक, डावीकडे वळून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरुन गाडगीळ पुतळा चौक. डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहिर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरून गाडगीळ पुतळा चौक मार्गे फडके हौद चौकाकडे जाताना (प्रेमळ विठोबा मंदिराकडे जाणारा रस्ता वगळून) वाहने जिजामाता चौकातूनच डावीकडे वळून जातील.

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळविण्यात येत असून ही वाहने अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.

बाजीराव रोडने सायंकाळी महत्वाच्या व मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पुरम चौकातून बाजीराव रोडने मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळविण्यात येईल. सदरची वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

त्याचप्रमाणे मानाचे गणपतींच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तसेच शहराचे मध्यवर्ती भागातील वाहतूकीची परिस्थती पाहून शिवाजी रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोड व इतर मिरवणुक मार्गावरील अंतर्गत वाहतूकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या आगामी पुस्तकातून उलगडणार मातृत्वाचा प्रवास

Posted by - March 6, 2024 0
पुणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शलाका मनीष तांबे लिखित बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या या पुस्तकाचे…
Pune News

Pune News : …तो शो ठरला अखेरचा ! थिएटरमधून बाहेर पडताच 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Pune News) पूर्ववैमनस्याच्या वादातून 8 ते 10 जणांच्या…

Breaking News ‘चित्रा वाघ यांनी जबाब द्यायला भाग पाडलं’, रघुनाथ कुचिक प्रकरणी पीडितेचा धक्कादायक दावा

Posted by - April 12, 2022 0
पुणे- रघुनाथ कुचिक प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पीडितेने खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे विशिष्ट…

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासने पुरविली अहोरात्र वैद्यकीय सेवा

Posted by - September 10, 2022 0
पुणे : पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांसाठी अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. याचा लाभ 347…

#Weather Forecast : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढचे 4 तास ‘या’ जिल्ह्यात खबरदारीचा इशारा

Posted by - March 16, 2023 0
पुणे : पुण्यात सकाळपासूनच वाटेवर ढगाळ होते. दुपारी पुण्यात आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. हवामानखात्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *