Chandni Chowk : चांदणी चौकातील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे : संभाजी ब्रिगेडची मागणी

486 0

पुणे : आज चांदणी चौकातील (Chandni Chowk) उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यामुळे तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे सुलभ होणार आहे.

या पुलामुळे पुणेकरांची वाहतुकीची समस्या सुटणार आहे. हा पूल (Chandni Chowk) एवढ्या 10 महिन्यात तयार करण्यात आला आहे. याचे उदघाटन आज पार पडणार आहे. या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र पुणे महानगपालिका, पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!