Chandni Chowk

Chandni Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपूल आजपासून प्रवाशांसाठी खुला; कशा आहेत मार्गिका?

748 0

पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची (Chandni Chowk Flyover) ओळख आहे.त्या चौकामध्ये (Chandni Chowk Flyover) प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते.त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि पुलाचे लोकार्पण आज पार पडत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

8 रॅम्प, 2 अंडरपास, 4 पूल, 2 सेवारस्ते असे मिळून सुमारे 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांनी चांदणी चौकाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 865 कोटी रुपये खर्च करून हा पूल बनवण्यात आला आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. पूर्वी 30 ते 35 हजार वाहनांची क्षमता असणाऱ्या मार्गावर आता दिवसाला दीड लाख वाहने धावणार आहेत.

पूर्वीचा चांदणी चौक…
मुंबईहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
बावधन, मुळशी व एनडीएहून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
बावधकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती
परिसरातील रहिवाशांना घरी किंवा बाहेर जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता.
परिणामी मुख्य मार्गावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

आताचा चांदणी चौक
रॅम्प-1 (मुळशी रस्त्यावरून सातारा/कोथरूडकडे जाण्यासाठी)
रॅम्प-2 (मुळशी रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी)
रॅम्प-3 (मुळशी रस्त्यावरून बावधन/पाषाणकडे जाण्यासाठी)
रॅम्प-4 (कोथरूड/सातारा रस्त्यावरून मुळशीकडे जाण्यासाठी)
रॅम्प-5 (एनडीए/बावधन रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी)
रॅम्प-6 (पाषाण/बावधन रस्त्यावरून सातारा/कात्रजकडे जाण्यासाठी)
रॅम्प-7 (सातारा/कोथरूड रस्त्यावरून पाषाण/बावधनकडे जाण्यासाठी)
रॅम्प-8 (सातारा/कोल्हापूर रस्त्यावरून मुळशी/पाषाण/बावधनकडे जाण्यासाठी)

‘या’ उड्डाणपुलाची माहिती
कामाचा कालावधी : फेब्रुवारी 2019 ते 12 ऑगस्ट 2023
मोठा पूल : लांबी 150 मीटर, रुंदी 32 मीटर
मुख्य रस्त्यावर : 9 मोठे गर्डर उभारण्यात आले आहे.
सेवा व अन्य रस्त्यांसाठी : 33 छोटे गर्डर उभारण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी सुरक्षा : 33 वार्डनची नेमणूक करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!