Chandani Chowk Accident

Chandani Chowk Accident : पुण्यातील चांदणी चौकातील पुलावर PMPML बसचा भीषण अपघात

10180 0

पुणे : अवघ्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील चांदणी चौकाचे लोकार्पण (Chandani Chowk Accident) करण्यात आले होते. याला काही दिवस उलटत नाही तोपर्यंत या ठिकाणी अपघाताचे सत्र सुरु झाले. पुण्यातील नव्या कोऱ्या चांदणी चौकातील पुलावर PMPML बसचा अपघात झाला आहे. कोथरुडकडे येणाऱ्या रस्त्यावर PMPML बस चिखल असल्याने घसरली आणि जेसीबीवर जाऊन आदळली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नवीन पुलापासून अगदी 200 मीटरवर हा अपघात झाला. मात्र या अपघातामुळे त्या ठिकाणी काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Share This News
error: Content is protected !!