तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्मदिवस “राज्य रिक्षा दिवस” म्हणून साजरा करू…!

934 0

पुणे :अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मार्गी लावावा,या विषयाचे निवेदन आमदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

याबाबत आमदार उदय सामंत यांचे आभार मानून कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आले तर रिक्षाचालक आणि कुटुंबीयांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवता येऊ शकतात अशी भावना बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.केशव नाना क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.

जर असे मंडळ प्रत्यक्षात अस्तित्वात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्मदिवस 9 फेब्रुवारी या दिवशी “राज्य रिक्षा दिवस” म्हणून महाराष्ट्रातील समस्त रिक्षाचालक साजरा करतील अशी ग्वाही डॉ.केशव नाना क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!