Gram Panchayat

Caste Validity Verification : जात वैधता पडताळणीचे काम आता सुट्टीच्या दिवशी पण सुरू राहणार

807 0

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Validity Verification)  समित्यांना आदेश दिला आहे की, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, वैद्यकीय- आयुष आणि कला शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासापासून कुठलाही मागासर्गीय विद्यार्थी वंचित राहू नये या साठी बार्टी ने हा निर्णय घेतला आहे.

अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची तारीख राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केली आहे. सर्व जात पडताळणी (Caste Validity Verification)   समित्यांनी जुलै 2023 अखेर 43 हजार 359 प्रकरणे निकाली काढली आहेत. परंतु, काही विद्यार्थ्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये विलंबाने अर्ज सादर केले आहेत. सीईटीच्या पात्र विद्यार्थ्यांना त्रुटींची पूर्तता करण्याबाबत संदेश आणि ई-मेलद्वारे कळवले आहे. तरीही त्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समितीशी संपर्क साधलेला नाही. त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी अर्जदारांची आहे. परंतु, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शनिवार आणि रविवारी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे,

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!