Bailgada

पुण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात; 1 जणाचा मृत्यू

760 0

पुणे : पुण्यात (Pune) वडकी या ठिकाणी आज बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race) आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 1 जणाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
शिवसेनेच्यावतीने (Shivsena) पुण्याजवाळील वडकी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीदरम्यान अचानक चेंगराचेंगरीची घटना घडली. तसेच बैलगाडा प्रेमींना बसण्यासाठी लावण्यात आलेले बेंच कोसळले. या दुर्घटनेत 1 जणाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

ही घटना घडल्याचे लक्षात येताच मैदानावरील पंचांनी तातडीने कार्यक्रमाच्या जवळच असलेल्या रुग्णवाहिकेला कॉल केला आणि तातडीने जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!