पुणेकरांच्या आजच्या त्रासाला भाजपचं जबाबदार; राष्ट्रवादीचा आरोप

479 0

पुणे:पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; अग्निशामक दलाकडे आठ ठिकाणी पाणी साठल्याच्या तर पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे

पुणे शहरात आज दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने रस्त्यांना अक्षरशः नदी नाल्यांचा स्वरूप प्राप्त झाला आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेतलं आहे.

राष्ट्रवादीचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचे लक्ष केवळ टेंडरवर असून च्या पंचवार्षिक मध्ये 99 नगरसेवक भाजपाला देऊन आता पुण्यातील पुणेकर डोक्यावर हात मारून घेत आहे अशी घनाघाती टीका त्यांनी केली.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले संपूर्ण पावसाळ्यात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून आज या सगळ्याची परिसीमा पाहायला मिळाली आजची पुणेकरांची संध्याकाळ कशी गेली असेल हे कधीही विसरता येणार नाही.

Share This News
error: Content is protected !!