Debu Khan

Debu Khan : लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

1630 0

पुणे : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी (Debu Khan) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक व्यवहारातून प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलगा डेबू खान यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी शिंदे वस्ती, सोमाटणे या ठिकाणी घडली होती. डेबू राजन खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी पांडुरंग सूर्यवंशी उर्फ देवा (रा. हडपसर, पुणे) प्रतीक जाधव, (रा. भारती विद्यापीठ, पुणे), गणेश वाळुंज आणि आकाश बारणे उर्फ नन्या माऊली वडेवाले (दोघेही रा. कात्रज, पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डेबू यांच्या बहिणीने मंगळवारी (१७ ऑक्टोबर) तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा भाऊ डेबू याने आरोपींना बचत गटाचे तसेच बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले होते. दरम्यान, डेबू आरोपींकडे पैसे माघारी मागत होता. मात्र, आरोपींनी पैसे आम्हाला दिलेच नाहीत, असे म्हणून टाळाटाळ केली. तसेच, न वटणारे धनादेश देऊन फिर्यादी यांची बोळवण केली. अशा प्रकारे आरोपींनी वारंवार दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून डेबू याने 2 ऑक्‍टोबर रोजी शिंदे वस्ती, सोमाटणे या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तळेगाव दाभाडे पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!