रिकाम्या जागेवर बसला म्हणून प्रवाशाला बेदम मारहाण, सिंहगड एक्प्रेसमधील घटना

1083 0

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्‍स्प्रेसमध्ये जागेवरून वाद होऊन एका प्रवाशाला सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संदीप सिद्राम गोंरगावे (वय ३७, रा. वराळे, ता. मावळ) असे मारहाणीत जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप हे सोमवारी सकाळी पुणे मुंबई सिंहगड एक्‍स्प्रेसने प्रवास करत होते. लोणावळा स्टेशनवरून ते सिंहगड एक्‍स्प्रेसमध्ये चढले. पासधारकांच्या बोगीत एका ठिकाणी जागा दिसल्याने त्यांनी रिकाम्या जागेवर बसण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे असलेल्या सात प्रवाशांनी संदीप यांना विरोध केला. त्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यातून सात जणांनी संदीपला बेदम मारहाण केली. यात संदीप यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

सिंहगड एक्स्प्रेमध्ये महिला प्रवाशांचे गुपचूप व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकाला पकडले

याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पासधारकांच्या डब्यामध्ये जुन्या पासधारकांकडून नवीन पासधारकांना धमकाविण्याचे आणि मारहाणीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या महिन्यातील मारहाणीची ही पाचवी घटना आहे. काही आठवड्यापूर्वी सिंहगड एक्प्रेसमध्ये मोबाइलमधून महिला प्रवाशांचे चित्रीकरण करणाऱ्या प्रवाशाला पकडण्यात आले होते. सदर प्रवाशी एका मदरसा मध्ये शिक्षक असल्याचे उघडकीस आले होते.

 

Share This News
error: Content is protected !!