gautami patil

माझ्या लग्नात जो गोंधळ घालायचा तो घाला; गौतमी पाटीलचे पत्रकारांना उत्तर

2094 0

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही आपल्या नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आणि राडा ही समीकरण आता महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे. हीच गौतमी पाटील सोमवारी बारामतीमध्ये (Baramati) एका कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिला पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची जोरदार उत्तर दिली.

तिने दिलेल्या एका उत्तराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मी लवकरच लग्न करणार आहे, माझ्या लग्नाला मी तुम्हाला बोलावीन तेव्हा तुम्हाला माझ्या लग्नात काय गोंधळ घालायचा आहे तो घाला असे गौतमी पाटील एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली आहे. यावेळी गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचे उद्धाटन जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे (District Bank Director Dattatraya Yele) यांनी केले.

यात्रा कमिटीने केलेले चोख नियोजन त्यास पोलिस निरीक्षक किरण अवचर व सहकारी पोलिसांनी ठेवलेला बंदोबस्त यामुळे नेहमी गोंधळ व राडा होणारा हा कार्यक्रम शांततेमध्ये पार पडला. यावेळी दहा हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. विशेषतः या कार्यक्रमास महिलांची संख्या अधिक होती.याबद्दल गौतमी पाटील यांनी सगळ्यांचे आभार मानले आहे.

Share This News
error: Content is protected !!