Banner

Ajit Pawar : ‘साहेब दादांना सीएमपदासाठी आशिर्वाद द्या’; बारामतीत झळकले बॅनर

849 0

पुणे : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला उधाण आलं आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. बारामतीमध्ये लावण्यात आलेलं एक बॅनर आहे. अनिकेत पवार मित्र परिवाराच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरवर अजित पवार यांच्या फोटोसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो आहेत.

काय लिहिले आहे बॅनरवर?
‘आदरणीय साहेब, दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण ठाम पणे उभे रहाल हा समस्त बारामतीकरांचा विश्वास नाही तर खात्री आहे. ’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. अनिकेत पवार मित्र परिवाराकडून हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान पवार कुटुंबीय बारामतीत दिवाळीसाठी एकत्र आलेलं पाहायला मिळालं. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शारदोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात संगीत गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले. यावेळी बहीण भावांचं बाँडींगही पाहायला मिळालं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!