पुणे :पूर्वाश्रमीचे रिक्षाचालक असणारे, सामान्य कुटुंबातुन येणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभले आहेत. ही एक ऐतिहासिक घटना आहे.सामान्य कष्टकरी पार्श्वभूमी असणारे सुद्धा या देशात मुख्यमंत्री पदासारखी मोठी जवाबदारी घेण्यास पात्र आहेत,हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचा विजय आहे असे आम्हास वाटते. महाराष्ट्र राज्यातील समस्त 12 लाख रिक्षाचालकांना व रिक्षाव्यवसायावर प्रत्यक्षपणे अवलंबून असणाऱ्या 60-70 लाख नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या कुटुंबातील सदस्य वाटत असून त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे.अशी भावना बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात अली आहे.
काही धनदांडग्या प्रवृत्ती माननीय मुख्यमंत्री महोदय यांना रिक्षाचालक म्हणून हिनवण्याचा प्रयत्न करत असून अश्या लोकांना कष्टकरी वर्गातील कर्तृत्ववान व्यक्तींबाबत आकस असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांना पाठिंबा म्हणून टीम बघतोय रिक्षावाला तर्फे मुख्यमंत्री यांना रिक्षाची प्रतिकृती व त्यांचे नाव असणारा रिक्षाचा युनिफॉर्म रिक्षाचालक कुटुंबीयांतर्फे भेट देण्यात येणार आहे.
तसेच रिक्षाचालकांच्या मागण्यांचे निवेदन सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय यांना संघटनेमार्फत आज दि. 9 जुलै 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता,व्यापारी मॉल हडपसर नगरसेवक नाना भानगिरे यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात देण्यात येईल. स्वागतासाठी हजारोंच्या संख्येमध्ये रिक्षाचालक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली आहे.