Crime

Crime News : पुणे हादरलं ! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून हल्ला

484 0

पुणे : महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस (Crime News) वाढ होताना दिसत आहे. सतत या ना त्या कारणाने महिला अत्याचाराच्या बळी पडताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात (Crime News) घडली आहे. यामध्ये आरोपीने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर घरात घुसून ब्लेडने वार केले आहेत. ही घटना पिंपरी चिंचवड येथील आनंदनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
नाना जालिंदर गायकवाड असे 30 वर्षीय आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी आणि आरोपी दोघेही आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवासी आहेत. आरोपीचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते. तरुणी एकदा कामावर जात असताना आरोपीने तरुणीला अडवून तिचा मोबाईल नंबर मागितला. मात्र तरुणीने नंबर दिला नाही यामुळे आरोपी चिडला. तरुणी आपल्या प्रेमसंबंधाला प्रतिसाद देत नसल्याने आरोपी संतापला आणि तिच्या घरात घुसला.

यानंतर त्याने तरुणीच्या घरात घुसून तिच्या हातावर ब्लेडने वार (Crime News) केले. तसेच शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. यानंतर तरुणीने चिंचवड पोलिसात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. वारंवार महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटना पाहता सतत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!