सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचं निधन

557 0

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तलयात सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे अशोक धुमाळ यांचे निधन झाल्याने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. 

धुमाळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. अशोक धुमाळ भारती विद्यापीठ भागात राहायला होते. सदनिकेतील गॅलरीतून ते पाय घसरून पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला

बंडू आंदेकर आणि टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन मिळाल्याने अशोक धुमाळ चर्चेत आले होते. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आंदेकर टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन मिळाला, असा खोचक टोला कोर्टाकडून लावण्यात आला होता. गुंड बंडू आंदेकर आणि टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन मिळाला, या कारणावरून अशोक धुमाळ अस्वस्थ असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातं.

Share This News
error: Content is protected !!