University Of Pune

University of Pune : पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह मजकूर; विद्यापीठाकडून कारवाईची प्रक्रिया सुरु

291 0

पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. या प्रकाराची विद्यापीठाने गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलांची आणि मुलींची स्वतंत्र वसतिगृहे आहेत. त्यातील मुलांच्या वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे.

या सगळ्या प्रकारामुळे विद्यापीठामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराविरुद्ध भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आंदोलन सुरु आहे. हा मजूकर लिहिणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide