पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी 

1378 0

प्रादेशिक हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्यामध्ये मंगळवारी ९ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे.

नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे…

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!