PHOTO : अक्षय कुमारने घेतला पुण्यातील मिसळीचा आस्वाद ; INSTA वर फोटो शेअर करून म्हणाला ,खूप छान….

342 0

पुणे : पुण्याची मिसळ म्हणजे पुणेकरांचा अगदी जीव कि प्राणच आहे. या पुणेरी मिसळीचे महाराष्ट्रभरात चहाते तर आहेतच… पुण्यामध्ये नुकताच अक्षय कुमार या बॉलिवूडच्या खिलाडी नं. १ मिसळीचा आस्वाद घेताना दिसून आला.

विशेष म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी कुमार यानी पुण्याच्या मिसळपावसह मराठी खाद्य संस्कृतीनुसार थालीपीठाचा देखील आस्वाद घेतला आहे. हे सर्व पदार्थ अक्षय कुमारला इतके पसंत पडले की त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यावर कॅप्शन दिले आहे की , ” प्रत्येक पुणेकरांचा जीव की प्राण आणि शान असलेला , मिसळ पाव… अशी मिसळ देऊन आमचं पोट आणि मन तृप्त केल्याबद्दल खूप आभार…,खूप छान…!

खिलाडी कुमारच्या या पोस्टवर अनेकांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सही केले आहेत.

Share This News
error: Content is protected !!