Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी मेट्रोचा आढावा घेत नागरिकांशी साधला संवाद

566 0

पुणे : आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यामुळे तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे सुलभ होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मेट्रोतून प्रवास करत नागरिकांशी संवाद साधला आहे. यामध्ये त्यांनी लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान अजित पवारांनी ज्येष्ठ नागरिकांशीदेखील संवाद साधला. तसेच काही आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या सगळ्यानंतर अजित पवार चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्धघाटनासाठी जाणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!