भारताच्या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.
चंद्रयान – ३ च्या यशस्वी स्वारीनंतर सौर मोहिमेतील आदित्य एल – १ हे भारताचं पहिलं सूर्ययान आज सूर्याच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. यशस्वी चंद्र मोहिमेनंतर अवकाश संशोधन क्षेत्रातील जागतिक सत्ता बनलेल्या भारतानं आज अवकाश महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. चंद्रयान आणि… pic.twitter.com/9Ce5B4WugG
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 2, 2023
अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया
चंद्रयान – 3 च्या यशस्वी स्वारीनंतर सौर मोहिमेतील आदित्य एल – 1 हे भारताचं पहिलं सूर्ययान आज सूर्याच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. यशस्वी चंद्र मोहिमेनंतर अवकाश संशोधन क्षेत्रातील जागतिक सत्ता बनलेल्या भारतानं आज अवकाश महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. चंद्रयान आणि आता सूर्ययानाच्या माध्यमातून भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला जागतिक ओळख, वलंय, विश्वास मिळवून देणाऱ्या isro चे सर्व आजीमाजी वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अभियंता, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त भारतीयांचं मी अभिनंदन करतो.