Fire in Marketyard

मार्केटयार्ड येथे पुन्हा एकदा भीषण आग ! दोन कामगारांचा मृत्यू तर 1 जण जखमी

404 0

पुणे : पुणे – काल मध्यराञी 1 वाजता (दिनांक 13•06•2023) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मार्केटयार्ड, गेट नंबर एक, हॉटेल रेवळ सिद्धी येथे आग लागल्याची वर्दि प्राप्त होताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि मुख्यालयातून एक फायरगाडी व जंम्बो वॉटर टँकर रवाना करण्यात आला होता. घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पाहिले की, सदर ठिकाणी दोन मजले असणाऱ्या इमारतीत हॉटेलमधे आग लागली होती.

Fire

शटर आतमधून कुलूपाने बंद असून 3 कामगार पोटमाळ्यावर अडकल्याचे समजले असता जवानांनी तातडीने बोल्डकटर या अग्निशमन उपकरणाने शटर तोडून बी ए सेट परिधान करत आतमधे पोटमाळ्यावर प्रवेश केला व आगीवर पाण्याचा मारा सुरू ठेवत तिथे अडकलेल्या 3 कामगारांना जखमी व बेशुद्ध अवस्थेत तत्परतेने बाहेर काढून शासकीय रुग्णवाहिका क्रमांक 108 मधून ससून रुग्णालयात रवाना केले आणि पुढे कार्यवाही करत आग पुर्ण विझवली. आगीचे कारण समजू शकले नाही. आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली व मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. या ठिकाणी चार सिलेंडर बाहेर काढले.

शशिकांत गवळी,मुन्ना ,संदिप अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. यांचे वय अंदाजे २५-३० वर्षे आहे. या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे तसेच तांडेल मनिष बोंबले, मंगेश मिळवणे व फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख यांनी सहभाग घेतला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!